नवाझुद्दीन सिद्दीकी गिरवत आहे मराठीचे धडे | Latest Bollywood Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी साकारतो आहे, ही बातमी अनेकांना चकीत करणारी ठरली. ही भूमिका आव्हानात्मक असल्याचं नवाझुद्दीननं म्हटलं आहे. या भूमिकेसाठी मराठी भाषा शिकण्याचं शिवधनुष्यही त्यानं पेललं आहे.‘ठाकरे’ या सिनेमाचा फर्स्ट लूक जाहीर झाला आणि पोस्टरवर दिसणारा अभिनेता कोण, ही उत्सुकता सगळ्यांच्या मनात दाटून आली. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव जाहीर झालं, त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका तो कसा पेलणार इथपासून त्यानं केलेल्या तयारीची चर्चाच सुरू झाली. शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारायला मिळणं, हे आव्हान असून त्यासाठी कसून मेहनत घेत असल्याचं नवाझुद्दीननं सांगितलं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews